प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.comप्रस्तावना !


मी माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले.
व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....आज फक्त आपल्या देशातच नव्हे तर सर्व जगभर धर्मवाद जातीयवाद .. वर्णभेद ...लिंगभेद अश्या मूळ समस्यांसोबतच .. वाढती लोकसंख्या ..बेरोजगारी ..मंदी आतंकवाद .. भ्रष्टाचार .. विविध असमानता अश्या समस्या आहेत.
निसर्गाने सर्व प्राण्यांपेक्षा कुशाग्र बुद्धी .. असामान्य चातुर्य ...प्रदान केलेला मानव हा निसर्गाची सर्वात उत्तम निर्मिती आहे ..मात्र या बुद्धीचा ..चातुर्याचा .. सर्वमानव जातीचे कल्याण कारणासाठी वापर करणारे महात्मे बोटावर मोजण्या इतके सापडतील . आणि या निसर्गाने प्रदान केलेल्या शक्तीचा काम ..क्रोध ..लोभ ..मद.. मोह .मत्सर या विकारांच्या आधीन होऊन गैरवापर करणारे लोक अधिक आहेत ..त्यातूनच मानवाला नित्यनवीन समस्यांना सामोरे जावे लागतेय .. मानवी जीवनाचे मला समजलेले मोल वाचकांपर्यंत पोचविण्याचा माझा प्रयत्न आहे.
देव ..अल्लाह ..गाँड तसेच विविध धर्मांच्या अश्या संकल्पना ...खरेतर एका मानवाने आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणती तरी शक्ती आहे हे मान्य करावे या साठी निर्माण झाल्या .. त्या असामान्य शक्तीला वेगवेगळी नावे देवून चमत्कारांच्या रुपात वर्णून मानवाने इतर मानव आणि प्राणी निसर्ग यांचे महत्व समजून घ्यावे ..तसेच विकारांच्या अधीन होऊन कोणावर अन्याय करू नये .. दीन..दुखीः ..अशक्त .. जीवांचे हक्क हिरावून घेवू नयेत म्हणून निर्माण झाल्या .. प्रत्येक धर्मात पाप - पुण्याची संकल्पना याचकरिता सांगितली गेलीय ..मात्र मानवांमधील काही धूर्त लोकांनी स्वतचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी देव ..धर्म जात यांचा आधार घेवून सरळ सरळ वेगवेगळे भेद निर्माण केले .. या भेदांच्या आड लपून काही धर्ममार्तंड पूर्वी स्वतचा स्वार्थ साधून घेत असत ..त्यांच्याच जोडीला आता राजकारणी लोक देखील त्यात सामील झाले आहेत .. या संधीसाधू लोकांना फक्त स्वतचा ..स्वतच्या कुटुंबाचा ..स्वार्थ साधायचा असतो ..त्यासाठी ते सर्व मानवांना वेठीस धरत आहेत .. भूक लागल्यावर खाणे ही प्रकृती .. स्वतः उपाशी राहून इतरांना खावू घालणे ही संस्कृती ..तर स्वतची राक्षसी भूक भागविण्यासाठी इतरांच्या हक्काचे हिसकावून खाणे ही नक्कीच विकृती आहे मग ते अन्न असो ..निवारा असो .. अथवा भावनिक ..भौतिक सुख असो ....तर अश्या विकृतीचे प्रमाण वाढून प्रकृती संपत चाललीय आणि संस्कृती तर नष्टच झालीय असे चित्र आहे ...आतंकवाद ..जातीय दंगली ..धार्मिक अथवा वांशिक दंगली ....सत्तास्पर्धा ...संपत्ती साठविण्याची स्पर्धा ..वर्चस्ववाद .. पाठीराखे वाढविण्याची स्पर्धा या विकृतींचे प्रतिक आहे ..या सर्व विकृतींसाठीच वेगवेगळ्या धर्मात ..राक्षस ..सैतान ..हैवान असे शब्द वापरले गेले असावेत ..पूर्वी पुराणात अश्या राक्षसांचे ..सैतानांचे विशिष्ट स्वरुपात वर्णन केले जायचे भयानक चेहरा .. विकट हास्य .. डोक्यावर शिंग .. अंगावर केस .. मोठे सुळे .. वगैरे ..मात्र आता कलीयुगात सुंदर चेहरा .. प्रभावी वक्तृत्व ..लोककल्याणाची भाषा ...अन्याय निर्मुलनाचे थोर हेतू .. दीन दुबळ्यांचे रक्षण ..विशिष्ट जाती धर्माच्या कल्याणाची उदात्त तत्वे वगैरे ओठी बाळगून हे सैतान मानव जन्मात प्रवेशले आहेत ..सर्व सामान्य माणूस असे सैतान विशिष्ट शारीरिक ठेवण ..अथवा विकृत अवयव नसल्याने सहजा सहजी ओळखू शकत नाहीय आणि झुंडशाही म्हणजे कल्याण मानून किरकोळ स्वार्थाच्या आहारी जावून या सैतानांच्या कारवायांना बळी पडतोय .. भरडला जातोय ..आंधळेपणाने बदल्याची ..खुन्नसची भाषा करतोय ....समाजासाठी झटणाऱ्या थोर व्यक्तींना जाती धर्माची लेबले लावून संकुचित करतोय ..मी सर्व जाती धर्मात असे सैतान आणि थोर महात्मे देखील अनुभवले आहेत त्यातून नेमके सैतान ओळखून त्याला संपविण्याचे काम महाकठीण होत चाललेय ..एकीकडे अश्या गंभीर समस्या असताना देवाची संकल्पना का निर्माण झाली असावी याचा विचार न करता .. शोध न घेता .. अंधश्रद्धा ..अर्धश्रद्धा ..वाढत जावून जीवनाप्रती असणारी असीम श्रद्धा कमी होऊ लागली आहे ' जगा आणि जगू द्या ' हा सर्व धर्मांचा गाभा असणारा मूळ अर्थ संपून केवळ शक्ती प्रदर्शन ... शस्त्रे.. विध्वंसाच्या नवनवीन कल्पना समोर येत आहेत .. माझ्या या जीवन प्रवासातून मी काही शिकवू इच्छित नाहीय तर केवळ माझी समज ..उमज ..अनुभव या आधारे मला झालेले जीवनदर्शन मांडतो आहे .

1 टिप्पणी:

  1. तुषारजी आपण आपल्या आयुष्यातील अनुभव आज तरुण पिढी समोर विस्तृत स्वरुपात मांडले आहेत खरेच तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमचा लेख नक्कीच नवतरुणांना दिशा दर्शक म्हणून काम करेल.

    जवाब देंहटाएं