प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



रविवार, 10 मार्च 2013

आरंभ

|| श्री गणेशाय नमः  || 

This is blog by Shri. Tushar Natu .
He will personally share his personal , valuable experiences with you.

He was a former addict , and now working in Maitri rehabilitation institute in maharashtra.
All further posts will be of his own .

Thank You .

हा ब्लॉग श्री तुषार नातू यांचा आहे .
 ते मैत्री डिअ‍ॅडिक्शन सेंटर  येथे  समुपदेशक म्हणून काम करतात.
व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे.
त्यांनी स्वत:च्या जीवनातील व्यसनाधीनता, त्यातून घडलेली सुधारणा व  सध्या  चालू असणारे कार्य या बाबतीतील अनुभव त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहीले आहेत.



-- Chinmay Joshi .

2 टिप्‍पणियां: